दिवाळी पाडवा 2027 शुभेच्छा फोटो आणि संदेश - Padwa Wishes in Marathi

दिवाळी पाडवा 2027 कधी आहे?

  • दिवाळी पाडवा

दिवाळी पाडवा म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा, अर्थात बलिप्रतिपदा. साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त हा दिवस, म्हणून नवं काम, नवी खरेदी किंवा नव्या हिशेबाची सुरुवात याच दिवशी केली जाते. बळीराजाच्या आठवणीत "इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो" असं म्हणण्याची रीत आहे.

पाडव्याला पत्नी पतीचं औक्षण करते आणि पती तिला ओवाळणी देतो, त्यामुळे हा नवरा-बायकोच्या नात्याचा सण आहे. व्यापारी घरांत नव्या वर्षाची सुरुवातही याच दिवशी होते. दिवाळी पाडव्याचे फोटो आणि संदेश जोडीदार आणि कुटुंबासाठी वेगळे, आणि ग्राहकांसाठी वेगळे दिले आहेत. नवविवाहित जोडप्याचा पहिला पाडवा, म्हणजे दिवाळसण, माहेरी मोठ्या थाटात साजरा होतो.

सोने-चांदीपेक्षा मौल्यवान असतात - सण आणि विशेष दिवस, फुलं, कमळ, दिवा

दिवाळी पाडवा फोटो आणि पोस्टर

दिवाळी पाडवा शुभेच्छा संदेश - कॉपी करा

कुटुंबातील सदस्यांसाठी दिवाळी पाडवा शुभेच्छा

पाडव्याचा सर्वात खास संदेश जोडीदारासाठी - वर्षभराच्या साथीबद्दल आभार आणि पुढच्या वर्षासाठी शुभेच्छा. घरातल्या मोठ्यांना नमस्कार आणि नव्या वर्षाच्या शुभेच्छा पाठवायला विसरू नका.

ग्राहक आणि व्यवसायासाठी दिवाळी पाडवा शुभेच्छा

ज्या व्यवसायांचं नवं वर्ष पाडव्याला सुरू होतं, तिथे ग्राहकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा, मागच्या वर्षीच्या साथीबद्दल आभार आणि फर्मचं नाव - हाच पाडव्याचा योग्य संदेश.

दिवाळी पाडवा - प्रश्न आणि उत्तरं

पाडव्याला नवऱ्याला किंवा बायकोला काय लिहावं?

साथीबद्दल आभार आणि पुढच्या वर्षाची कामना, तुमच्या शब्दांत. उदाहरणार्थ - "तुझ्यासोबत प्रत्येक दिवाळी अधिक उजळ वाटते. पाडव्याच्या खूप शुभेच्छा." Toran ॲपमध्ये पाडव्याच्या पोस्टरवर तुमचं नाव लावून पाठवता येतं.

पाडव्याला बलिप्रतिपदा का म्हणतात?

वामन अवतारात विष्णूंनी बळीराजाला पाताळात पाठवलं आणि वर्षातून एक दिवस पृथ्वीवर येण्याचं वरदान दिलं, अशी कथा आहे. तो दिवस कार्तिक शुद्ध प्रतिपदा, म्हणून पाडव्याला बलिप्रतिपदा म्हणतात.

दिवाळी पाडवा आणि गोवर्धन पूजा एकाच दिवशी असतात का?

हो, दोन्ही कार्तिक शुद्ध प्रतिपदेला येतात. उत्तर भारतात हा दिवस गोवर्धन पूजा आणि अन्नकूट म्हणून, गुजरातमध्ये नववर्ष म्हणजे बेसतु वरस म्हणून, आणि महाराष्ट्रात पाडवा म्हणून साजरा होतो.

शुभ दीपावली सणाचे दिवस

20 हजार+ डिझाइन, प्रत्येकापासून तुमचा पोस्टर बनवा

नाव आणि फोटो असलेला पोस्टर बनवण्यासाठी Toran ॲप हवं. ॲप नसेल तर इन्स्टॉल करा. एकदा तुमचं नाव आणि फोटो जोडा - दुकानासाठी लोगो आणि फोन नंबर - मग ॲपमध्ये उपलब्ध डिझाइन निवडा. रोज नवी डिझाइन जोडली जातात.

Google Play वरून डाउनलोड कराApp Store वरून डाउनलोड करा
तुमचं नावतुमचा फोटो

नमुना. ॲप इथे तुमचं स्वतःचं नाव आणि फोटो लावतं.

हे डिझाइन Toran मध्ये उघडण्यासाठी तुमच्या फोनने स्कॅन करा